Published On : Thu, Feb 11th, 2021

NHAI-मनपाचे आंतरजोडणीच्या कामासाठी २४ तासांचे शटडाऊन १२ फेब्रूवारी रोजी

लकडगंज झोनमधील देशपांडे ले आउट आणि लकडगंज जलकुंभांचा पाणीपुरवठा शुक्रवारी राहणार बाधित

नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांनी मानेवाडा चौक येथे नवीन ५०० मिमी व्यासाच्या वाहिनीची आंतरजोडणी जुन्या ७०० मिमी व्यासाच्या वाहिनीशी करण्यासाठी २४ तासांच्या शटडाऊनची विनंती केली आहे. NHAI राष्ट्रीय महामार्ग ६ वर चौपदरी उड्डाणपूल बांधण्याचे काम करत आहे. याचाच भाग म्हणून ‘युटीलिटी शिफ्टिंग’ कार्यक्रमांतर्गत करण्यात येत असलेल्या याकामाला २४ तासांचा अवधी लागेल. हे काम 12 फेब्रू, २०२१ रोजी सकाळी १० वाजता ते १३ फेब्रू सकाळी १० वाजेपर्यंत वाठोडा -मानेवाडा चौक रिंग रोड वरील नाग नदीजवळ सुरु होईल.

Gold Rate
03 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,100 /-
Gold 22 KT ₹ 1,12,600 /-
Silver/Kg ₹ 1,51,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या २४ तास शटडाऊन दरम्यान पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:
देशपांडे ले आउट जलकुंभ : देशपांडे ले आउट, त्रिमूर्तीनगर, वर्धमाननगर, पूर्व वर्धमाननगर , प्रजापती नगर , नेहरू नगर, शरद नगर, देवी नगर, संघर्ष नगर, वाठोडा , सदा शिव नगर, घर संसार सोसायटी, कामाक्षी नगर, शैलेश नगर.

लकडगंज -१ जलकुंभ: हिवरी नगर, LIG, MIG कॉलिनी, पडोले नगर, पद्लोए नगर वस्ती, पंठेर नगर, EWS कॉलोनी, शिवाजी सोसायटी.

Advertisement
Advertisement