| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Apr 30th, 2018

  नवनियुक्त कुलगुरुंनी घेतली उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट

  मुंबई : मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर यांनी आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

  यावेळी श्री.तावडे म्हणाले, मुंबई विद्यापीठाचा नावलौकिक वाढून विद्यापीठाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी शासनामार्फत आर्थिक व प्रशासकीय पाठिंबा देण्यात येईल. नवनियुक्त कुलगुरूंकडून शासनाच्या भरपूर अपेक्षा असून त्या ते समर्थपणे पूर्ण करतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

  यावेळी मुंबई विद्यापीठाचे प्रलंबित असलेले निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगून डॉ.पेडणेकर म्हणाले की, नॅक ॲक्रीडिटेशनची पूर्तता करणे, विद्यापीठातील रिक्त जागा भरणे, कामाची विभागणी करणे आदी कामांचा प्राधान्याने निपटारा करण्याचे प्रयत्न करण्यात येतील. तसेच विद्यापीठ कायद्यानुसार कामकाज सुरळीत चालण्यासाठी प्राचार्य, शिक्षक यांच्याशी समन्वय साधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

  यावेळी श्री.तावडे यांनी नवनियुक्त कुलगुरुंना ‘यू कॅन वीन’ आणि ‘तुकाराम दर्शन’ ही पुस्तके भेट दिली.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145