
नागपूर, : नागपूर महानरगपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या श्रीमती शिवाणी सुधांशु दाणी आणि परिवहन समितीच्या सभापतीपदी श्रीमती मंगला शशांक खेकरे यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर मनपा मुख्यालयातील हिरवळीवर पार पडलेल्या पदग्रहण सोहळ्यात राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी दोन्ही सभापतींवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
पिठासीन अधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.2) महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात स्थायी समिती आणि परिवहन समितीची विशेष सभा पार पडली. स्थायी समितीसाठी भाजपच्या शिवाणी दाणी यांचा एकमेव अर्ज वैध ठरला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तर परिवहन समितीसाठी श्रीमती मंगला खेकरे यांचा एकमेव अर्ज वैध वैध ठरला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती शिवानी दाणी आणि परिवहन समितीच्या सभापती मंगला खेकरे यांनी पदभार स्वीकारला. कार्यक्रमास शहराचे प्रथम नागरिक महापौर श्रीमती निता ठाकरे, आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार श्री. संदीप जोशी, माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार श्री. विकास कुंभारे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्ता पक्ष नेते श्री. नरेंद्र बोरकर, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, श्री संजय भेंडे, नगरसेवक सर्वश्री, विक्की कुकरेजा, बंडू राऊत, विजय झलके, संदीप जाधव प्रकाश भोयर, प्रदीप पोहणे, एबीपी माझाच्या संपादिका श्रीमती सरिता कौशिक, श्री. धनंजय बापट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नवनिर्वाचित सभापती व पदाधिकारी यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानगरपालिकेच्या 75 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत शहराला ‘ग्रीन सिटी’, ‘स्वच्छ सिटी’ आणि ‘सुरक्षित सिटी’ बनविण्याचा संकल्प व्यक्त केला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, पूरनियंत्रण, पाणीगळती रोखणे आणि भूजल पुनर्भरणासाठी मोठ्या प्रमाणात ‘रिचार्ज शाफ्ट’ उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. तसेच महिलांच्या बचत गटांना प्रोत्साहन देत रोजगारनिर्मितीला चालना देण्याचे आवाहनही केले. ‘पौर जन हिताय’ या ब्रीदवाक्याचा पुनरुच्चार करीत सर्व पदाधिकाऱ्यांनी नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याची आवाहन त्यांनी केले. नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरत पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
महापौर श्रीमती निता ठाकरे, आपल्या भाषणात सांगितले की, महानगरपालिकेच्या कारभारात महिलांना नेतृत्वाची संधी देणे ही अभिमानाची बाब आहे. शिवानी दाणी या अर्थशास्त्राच्या अभ्यासक असून, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प अधिक सक्षम व सर्वसमावेशक करण्यासाठी त्यांचा अनुभव उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मंगला खेकरे या परिवहन समितीच्या माध्यमातून शहरातील बससेवा अधिक प्रभावी व नागरिकाभिमुख करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
पुढील 15 दिवस प्रत्येक झोनमध्ये मतपेटी: शिवानी दाणी
स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी आपल्या मनोगतात नागरिकांच्या सहभागातून अर्थसंकल्प तयार करण्याची भूमिका स्पष्ट केली. पुढील 15 दिवस प्रत्येक झोनमध्ये मतपेटी ठेवून नागरिकांकडून सूचना मागविण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधा यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. परिवहन समिती सभापती मंगला खेकरे यांनी नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मनीष सोनी यांनी तर आभारही त्यांनी व्यक्त केले.
अशी पार पडली निवड प्रक्रिया…
पिठासीन अधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.2) महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात स्थायी समिती आणि परिवहन समितीची विशेष सभा झाली. सर्वप्रथम श्रीमती शिवाणी दाणी यांनी स्थायी समितीच्या सभापती पदासाठी नामनिर्देश पत्र निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांच्याकडे सादर केला. त्यानंतर पिठासीन अधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी नामनिर्देशन पत्राची पीठासीन अधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी अर्जाची छाननी केल्यानंतर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ दिला. मात्र, केवळ दाणी यांचाच अर्ज असल्याने सभापती पदी शिवाणी दाणी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा डॉ. विपिन इटनकर यांनी केली. तर परिवहन समितीसाठी श्रीमती मंगला खेकरे यांचा एकमेव अर्ज वैध वैध ठरला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
अमरावती में पांच जुआ अड्डों पर पुलिस की रेड
बच्चियों से छेड़छाड़ करने वालों को फाँसी तक की सजा मिलनी चाहिए।
पेपर लीक पर फडणवीस के इस्तीफे की मांग तेज
विकास निधि कार्यों में टेंडर घोटाले, जांच की मांग
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...




