Published On : Fri, Jun 27th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली जिवंत नवजात मुलगी; परिसरात खळबळ, मेडिकलमध्ये उपचार सुरू

Advertisement

नागपूर – नागपूर शहरातून एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गजानन नगर भागात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक नवजात मुलगी जिवंत अवस्थेत सापडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सध्या या बालिकेवर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार, सुदैवाने बाळाची प्रकृती स्थिर असून ती पूर्णपणे सुरक्षित आहे.

स्थानीय महिलेची सतर्कता आणि मानवता-
बुधवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास एक स्थानिक महिला, जी घरकाम करत असते, नेहमीप्रमाणे कामावर जात असताना तिला गजानन नगरमधील डंपिंग यार्डकडे लक्ष गेलं. तिथे तिला एका नवजात मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. तिने जवळ जाऊन पाहिलं असता, एका चिमुकलीला वस्त्राविना लावारस अवस्थेत कचऱ्यात टाकलेलं दिसून आलं.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्या महिलेने तत्काळ माणुसकीचे दर्शन घडवत बाळाला उचलले, स्वच्छ करून कपडे घातले आणि धंतोली पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी तातडीने सुरू केली चौकशी-
माहिती मिळताच धंतोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बाळाला तत्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर बाळाची तब्येत स्थिर असल्याचं सांगितलं.

Advertisement

दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. कोणत्या क्रूर व्यक्तीने हे अमानुष कृत्य केलं, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.या प्रकारामुळे नागपूर शहरात संतापाची लाट पसरली आहे. एक निरागस जीव कचऱ्यात टाकण्याची हृदयद्रावक कृती समाजातील संवेदनशून्यतेचे दर्शन घडवते. मात्र त्या महिलेच्या जागरूकतेमुळे एका निष्पाप जीवाचे प्राण वाचले, ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.