Published On : Wed, Sep 29th, 2021
maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

व्हॉट्‍स अपच्या नव्या फिचरने सायबर गुन्हेगारांच्या हाती कोलित: अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.

पुरावे नष्ट करण्याचा मार्ग मोकळा.

नागपूर: सोशल मिडियावरील नवनवे टूल्स, फिचर वापर नेटिझेन्सपेक्षाही सायबर गुन्हेगार करीत असून दिवसेंदिवसे या गुन्ह्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. आता व्हॉट्‍स ॲपने मोबाईल फोनमधील डाटा आणि मेमरी सेव्ह करणे या चांगल्या हेतूने ‘फोटो सेट टू सी वन्स’ हे नवीन फिचर सुरू केले. परंतु हे फिचर सायबर गुन्हेगारांसाठी पुरावा नष्ट करण्याचे अस्त्रच ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अ‍ॅपने आणलेल्या ‘फोटो सेट टू सी वन्स’ या नवीन फीचरमुळे एखाद्या व्यक्तीने पाठवलेला फोटो, व्हीडीओ एकदाच बघता येत आहे. त्यानंतर फोटो, व्हीडीओ गायब होतो, परत बघता येत नाही. त्याआतापर्यंत व्हॉट्‍स ॲपवर आलेले व्हीडीओ, फोटो गॅलरीमध्ये जमा व्हायचे. परंतु या नव्या फिचरमुळे गॅलरीत फोटो, व्हीडीओ जमा होत नसल्याने व्हॉट्‍स ॲप वापरणाऱ्यांचाही ‘भेजाफ्राय’ होत आहे. परंतु सायबर गुन्हेगारांसाठी हे फिचर चांगलेच अस्त्र ठरण्याची शक्यता सोशल मिडिया तज्ज्ञ व विश्लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केली. व्हॉट्सपमुळे वापरकर्तेही गोंधळून जात आहे. व्हॉट्स अ‍ॅप रोजच्या जीवनातली गरज बनली आहे. त्यामुळेच नवे फिचरही नागरिक काही दिवसांतच आत्मसातही करतील. ‘फोटो सेट टू सी वन्स’ व्हॉट्सॅपच्या या नव्या फिचरची नेटकऱ्यांमध्ये सध्या जोरात चर्चा आहे. परंतु गुन्हेगारांसाठी हे फिचर आयते कोलित असल्याचे पारसे म्हणाले.

एखाद्याने पाठवलेला फोटो, व्हिडीओ दुसरा व्यक्ती फक्त एकदाच बघू शकतो. त्यामुळे फोटो, व्हीडीओचा वापर करुन एखाद्या सराईत गुन्हेगाराने एखाद्याला धमकी दिली, एखाद्याचा विनयभंग केला, एखाद्याला खाजगी फोटो व्हायरल करण्यासाठी खंडणी मागितली, फोटोच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर व्हॉट्‍स ॲपच्या या नव्या फिचरमुळे पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी आवश्यक पुरावाच नष्ट होणार आहे. गेल्या सात वर्षांत राज्यात २३ हजारपेक्षा जास्त सायबर गुन्हे घडले, पण शिक्षा केवळ ९९ आरोपींनाच झाली. एकट्या नागपूर शहरात वर्षभरात सायबर गुन्ह्यांच्या संख्येत १०४ टक्के वाढ झाली. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचरमुळे सायबर गुन्ह्याच्या प्रमाणात आणखी वाढ होण्याची तसेच पुरावा नष्ट होणार असल्याने शिक्षेच्या प्रमाणात आणखी घट होण्याचा धोका वाढला आहे.

व्हॉट्स अ‍ॅपच्या ‘फोटो सेट टू सी वन्स’ या फीचरमुळे एखाद्याने पाठवलेला फोटो, व्हिडीओ एकदाच पाहता येतो. एखाद्याने नको ते फोटो, व्हीडीओ पाठवले तर ते गॅलरीतही जमा होत नाही. अशावेळी त्रास देणाऱ्याविरुद्ध तक्रारीसाठी पुरावाच उरत नाही. त्यामुळे व्हॉट्स ॲपच्या नव्या फिचरच्या माध्यमातून फोटो, व्हिडीओ आला तर लगेच स्क्रिन शॉट काढणे, स्क्रीन रेकॉर्ड करणे गरजेचे आहे. याचा पुरावा म्हणून वापर करता येईल.

– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक.
www.ajeetparse.com