Published On : Tue, Jul 27th, 2021
By Nagpur Today Nagpur News

घरफोडी प्रकरणाचा छडा लावण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त

Advertisement

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कल्पतरू कॉलोनीत सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी अज्ञात चोरट्याने संधी साधून घरफोडी केल्याची घटना 11 जुलै ला रात्री साडे अकरा दरम्यान घडली असता यासंदर्भात फिर्यादी सेवानिवृत्त शिक्षक अब्दुल कदिर अब्दुल जब्बार कुरेशी वय 63 वर्षे यांनी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 454, 457, 380 अनव्ये गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली असता अवघ्या दहा दिवसांत या घरफोडीचा पर्दाफाश करीत चोरट्यांचा शोध लावून चोरीस गेलेली एक वेगेणोर कार, एक दुचाकी यासह इतर साहित्य असे एकूण 3 लक्ष 47 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.तसेच या घटनेतील मुख्य पसार आरोपी प्रदिप उर्फ दादू ठाकूर वय 23 वर्षे रा चिखली कळमना व त्याचे साथीदार व एक विधिसंघरशीत बालका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी अजूनही अटकेबाहेर आहेत.

सदर चोरीचा प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपीचा शोध घेत चोरीस गेलेल्या कारचा पाठलाग करीत सावनेर मार्गे गेले असता आरोपीने कार उभी करून पळ काढण्यात यश गाठले असले तरी चोरीस गेलेला माल हस्तगत करण्यात आला.

Gold Rate
20 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,200/-
Gold 22 KT ₹ 1,22,900 /-
Silver/Kg ₹ 2,03,400/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही यशस्वी कारवाही डिसीपी निलोत्पल, एसीपी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनार्थ व पोलीस निरीक्षक विजय मालचे, पोलीस निरोक्षक मंगेश काळे यांच्या नेतृत्वात एपीआय सुरेश कंनाके, पोलीस उपनिरीक्षक बश्याम वारंगे, पोलीस पप्पू यादव, प्रमोद वाघ, आणिल बाळराजे, मनोहर राऊत, मंगेश लांजेवार, राजेंद्र टाकलीकर, निलेश यादव, ललित शेंडे, सुधीर कनोजिया, उपेंद्र यादव, संदीप गुप्ता, सुरेंद्र शेंडे, उपेंद्र आकोटकर यांनी केले असुन पुढील तपास सुरू आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement