Published On : Tue, Jul 6th, 2021

स्मार्ट सिटी क्षेत्रात तयार होत आहे प्रकल्पग्रस्तांसाठी नवीन इमारती

Advertisement

नागपूर: केन्द्र शासनामार्फत लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी स्वच्छ, शाश्वत व पर्यावरण पूरक शहरे तयार करण्यासाठी स्मार्ट सिटी अभियान अंतर्गत नागपूर शहराची निवड करण्यात आली आहे.

स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत प्रस्तावित विविध विकास प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी नागपूर स्मार्ट अँण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कारपोरेशन लिमिटेड (NSSCDCL) विशेष उद्देश वाहनाची निर्मिती करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत क्षेत्राधिष्ठीत विकास करण्यासाठी मौजा पारडी, भरतवाडा, पूनापूर व भांडेवाडी येथील १७३० एकर क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. या क्षेत्रासाठी विशेष रुपाने प्रारुप नगररचना परियोजना तयार करण्यात आली असून त्यास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ६८ मधील तरतुदीनुसार मंजूरी प्राप्त आहे. तसेच उक्त नगररचना परियोजनेसाठी विशेष विकास नियंत्रण नियमावलीस शासनाची मान्यता प्राप्त आहे. या योजनेच्या माध्यमातुन या क्षेत्राचा नियोजनबध्द विकास करण्यात येत आहे.

नागपूर स्मार्ट सिटी अंतर्गत परियोजनेच्या क्षेत्रामध्ये मौजा पुनापुर मध्ये रस्त्याच्या विकास कामांतर्गत विस्थापित होणा-या नागरिकांचे पुर्नवसन करण्यासाठी तीन इमारतींचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. तीन पैकी दोन इमारती अल्प उत्पन्न गटासाठी तर एक इमारत आर्थिक दृष्टया मागासलेल्या गटासाठी प्रस्तावित आहेत. टप्पा-१ अंतर्गत प्रत्येक इमारत पाच माळयाची असेल आणि सर्व मिळून १२० सदनिका व २० दूकानांचे नियोजन यामध्ये करण्यात आले आहे. हया प्रकल्पाचा कालावधी १८ महीने ठरविण्यात आला आहे. तसेच नियमानुसार पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागपूर स्मार्ट सिटी परिसरातील हया इमारती मायवन टेक्नॉलाजी फॉर्मवर्क मध्ये तयार करण्यात येत असून सदर इमारतीमध्ये सौर उर्जा प्रणाली व जलपुर्नभरणावर भर दिला आहे. हरित इमारत संकल्पना (Green building) वर आधारित या इमारतींमध्ये मल निस्सारण केन्द्र, मुलांकरीता खेळण्याची जागा, उद्यान, जॉगिंग ट्रॅक, मैदान, लिफ्ट प्रस्तावित करण्यात आली आहे.

नागपूर स्मार्ट सिटीचा उद्देश प्रकल्पग्रस्तांना उत्कृष्ट दर्जाच्या सोयी सुविधा, उच्च भूकंप प्रतिरोधक दर्जेदार इमारतीमधे जागा देवून त्यांचा जीवनमानाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न आहे.

इमारतींचे बांधकाम सुरु झालेले आहे आणि लवकरात-लवकर नागरिकांना राहण्यासाठी देण्याचा प्रयत्न आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement