नागपूर : अनेकदा आपण ऐकतो की लोक आपले ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत करतात, परंतु आर्थिक अडचणींमुळे बहुतेक लोक आपले ध्येय पूर्ण करू शकत नाहीत. तथापि, असे काही लोक आहेत जे आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करतात. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सूरजची कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे. अपंग असूनही त्याने हिंमत हारलेली नाही. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सूरज धडपड करीत आहे. सूरजचे स्वप्न आयएएस अधिकारी
(IAS Officer) बनण्याचे आहे, परंतु तो सध्या पुढच्या अभ्यासासाठी दिव्यांग सायकलवर 15 रुपयांना समोसे विकून पैसे कमवत आहे. सूरजने नागपूर विद्यापीठातून बीएससी पूर्ण केले पण त्याला चांगली नोकरी मिळू शकली नाही. हार मानण्याऐवजी, त्याने मेहनत करण्याचे ठरविले. यादरम्यान त्याने अनेक अडचणींचा सामना केला. सूरजच्या कथेचा व्हिडिओ फूड ब्लॉगर गौरव वासन यांनी त्यांच्या “स्वाद ऑफिशियल” चॅनेलवर शेअर केला होता आणि तो इतर प्लॅटफॉर्मवरही व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये, सूरज अस्खलित इंग्रजी बोलतो. तसेच तो या व्हिडिओमध्ये आपल्या जिद्दीची आणि संघर्षाची कहाणी सांगताना दिसत आहे.
सूरजची कहाणी या गोष्टीचा पुरावा आहे की जिद्द आणि कठोर परिश्रमाने आपण कोणत्याही परिस्थितीला समोर जाऊ शकतो. सुरज सारख्या व्यक्तीची कहाणी खरोखरच प्रेरणादायी असून तो असंख्य आव्हानांना तोंड देत आहे. आपल्याला स्वतःवर विश्वास आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर काहीही शक्य आहे याची आठवण करून देणारी त्याची कथा आहे.