Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jan 22nd, 2020

  नेताजी सुभाषचंद्र पुतळा परिसरात अस्वच्छता व अतिक्रमण

  कन्हान : – कांद्री ग्रामपंचायत हद्दीतील संताजी नगरातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा असलेला परिसर अस्वच्छता व अतिक्रमणाच्या विळख्या त सापडला असून कांद्री ग्रामपंचायत प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षा मुळे परिसरातील नागरीकांत प्रचंड असंतोष खदखदत आहे.

  १९९० च्या दशकात ग्रामपंचायत रहिवासी क्षेत्र वाढण्यास सुरुवात झाली .जवळच असलेल्या कोळसा खाणी व कारखाने यामुळे बाहेरील कामगार या भागात मोठ्या प्रमाणात आले. त्या काम गारांची गरज लक्षात घेऊन अनेकांनी या भागात लेआउट टाकले. त्यातील एका लेआउट वर संताजी नगर वसले. रुंद रस्ते, सांडपाणी नाल्या, विद्युत खांबे, व्यवस्थित पाणीपुरवठा व मोकळी मैदाने हे या नगराचे वैशिष्ट. एका ठिकाणी शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा तर दुसर्‍या जागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आला आहे.

  तिसऱ्या मोकळ्या जागेवर “तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा” हा नारा बुलंद करणारे महान क्रांतिकारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अर्धाकृती पुतळा मोठ्या आस्थेने नागरिकांनी १९९२ ला बसविला. याला जवळपास २८ वर्ष होत आहेत पण या जागेचा विकास करण्यात कांद्री ग्रामपंचायतचे पदाधिकारी व स्थानिक नेते अपयशी ठरले आहेत.

  २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, व २३ जानेवारी च्या अगोदरच्या दिवशी या पुतळ्याजवळील जागेची साफसफाई व पुतळ्याला रंगरंगोटी करण्यात येते. बाकी मात्र जैसे थे. सुमारे २०००० स्क्वे अर फूट असलेल्या या मोकळ्या जागेवर इंधन साठवणे, कचरा फेकणे हा कार्यक्र म सुरू असतो.

  एका कबाडी व्यावसायि काने तर आपला व्यवसाय चक्क या मैदानात आणला आहे. त्यासाठी झोपड पट्टीवासीयांच्या जाण्या-येण्याचा नेहमी चा मार्ग बंद करण्यात आला आहे. येथे एक सार्वजनिक नळ आहे.या नळा शेजा री खाली दारूच्या बाटल्यांचा ढीग काय मचा वास्तव्यास असतो. त्यामुळे विशेष ता महिलांना जगणे असह्य झाले आहे.

  प्रत्येक निवडणुकीदरम्यान या परिसराचा विकास करण्याचे आश्वासन देण्यात येते. मात्र आतापर्यंत नागरिकांच्या पदरी निरा शाच पडली आहे. साधी प्रकाश व्यवस्था करण्याचे औदार्य कांद्री ग्रामपंचायतने न दाखविल्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा अंधारातच आलेला दिवस ढकलत आहे.

  स्वातंत्र्यपूर्व काळात नेता जी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते व गेल्या अनेक वर्षापासून कांद्री ग्रामपंचायत मध्ये काँग्रेसची सत्ता आहे. पण बेवारस स्थितीत असलेल्या पुतळा परिसराचा विकास करण्याचा पाझर कांद्री ग्रामपंचायतला कधी फुटणार असा प्रश्न नागरिकात विचारला जात आहे.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145