Advertisement
लातूर: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) लातूर जिल्ह्यातील दोन शिक्षकांना NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित अनियमिततेप्रकरणी ताब्यात घेतले आहे.
लातूर येथील सरकारी शाळेत कार्यरत असलेले शिक्षक संजय तुकाराम जाधव आणि जलील उमर खान पठाण यांना एटीएसच्या नांदेड युनिटने अटक केली आहे. सध्या एटीएसचे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत.
याआधी शनिवारी केंद्र सरकारने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)चे महासंचालक सुबोध सिंग यांना हटविले. NEET-UG परीक्षेतील गैरप्रकारांचा तपास सीबीआयकडे सोपवला.