Published On : Thu, Jan 10th, 2019

राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा रायगडावर शुभारंभ

छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने परिवर्तन संपर्क यात्रेला सुरुवात…

मुंबई दि. १० जानेवारी –रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज भाजप सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले…

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधी मंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक, अनिल देशमुख, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार विदया चव्हाण, आमदार पांडुरंग बरोरा, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार जयदेव गायकवाड, आदींसह पक्षाचे इतर सर्व नेते उपस्थित होते.