Published On : Sat, Jul 22nd, 2017

रेशन व केरोसीन दुकानदारांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ढोल नगाडा बजाओ आंदोलन

Advertisement
  • 500 च्यावर रेशन व केरोसीन दुकानदारांनी घेतला ढोल नगाडा बजाओ आंदोलनात सहभाग
  • राज्यात 50 वर्षापासून 55 हजार रेशन दुकानदार व 50 हजार केरोसीन दुकानदार कार्यरत
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या ढोल नगाडा बजाओ आंदोलनाने अन्नधान्य वितरण कार्यालय दणाणले
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी ढोल वाजवित अधिकाऱ्यांसमोर मांडल्या रेशन व केरोसीन दुकानदारांच्या व्यथा


नागपूर :
शेतकऱ्यासोबत सर्वसामान्य जनतेची फसवणूक व खोटे आश्वासने देत सत्तेत आलेल्या भाजप सरकारने महागाई वाढवित जगणे कठिण केले. निवडणुकीपूर्वी जनतेला ‘‘अच्छे दिन’’चे आश्वासने देत भाजप सत्तेत आली पण आता आंधळे, बहिऱ्याचे सोंग घेणाऱ्या भाजप सरकारला जागे करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात ढोल नगाडा बजाओ आंदोलन अन्नधान्य वितरण कार्यालया समोर करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असतांना रेशन व केरोसीन दुकानात गोरगरीब जनतेला स्वस्त दरात गहू, तांदूळ, तेल व केरोसीन मिळत होते पण भाजप सत्तेत येताच दुसऱ्याच महिन्यात हुकूमशाही सारखे नियम लादल्याने गोरगरीबांना मिळाऱ्या अन्नधान्यांपासून वंचित व्हावे लागले.

तामिळनाडू सरकारने 2013 पासून रेशन व केरोसीन दुकानदारांना सरकारी सेवक घोषित करीत मासिक वेतन सूरू केले त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात रेशन व केरोसीन दुकानदारांना मासिक वेतन द्यावे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत असतांना एक गॅस सिलेंडर धारकांना 4 लिटर केरोसीन मिळत होते पण भाजपाने बंद केले ते नियम रद्द करून पुन्हा 4 लिटर केरोसीन द्यावे, रेशन व केरोसीन दुकानात वापरण्यात येणारी मशिन लहान व वेळ घेणारी असल्याने ते रद्द करून एटीएम सारखे धान्यवितरणाचे कार्ड देवून बॅंकेतून व्यवहार व्हावे, केरोसीन दुकानदारांना महिन्याच्या 15 तारखेनंतर केरोसीन कोटा देण्यात येता तो महिन्याच्या पहिल्या आठवडयात देण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन अन्नधान्य वितरण अधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात देण्यात आले.


यावेळी आॅल महाराष्ट्र फेअर प्राईस शाॅपकिपर्सचे संजय पाटील, मोहनलाल शर्मा, सुभाष मुसले, बाळू बिहाडे, रितेश अग्रवाल, गोपाल शर्मा, किशोर कन्हेरे, कुमार रामटेके, मनोज केसरवाणी, मोहम्मद सलीम, नितीन कुकडे, निलेश सोनटक्के राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश गवई, विजय गजभिये सह 500 च्यावर पदाधिकारी उपस्थित होते.