Published On : Fri, Jul 3rd, 2020

इंधन दरवाढीच्या विरोधात मौदयात राष्ट्रवादीची गांधीगिरी

नागपुर – राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मौदा तालुक्याच्या वतीने जिल्हा अध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांच्या नेतृत्वात एक ही भूल कमल का फूल, पेट्रोल डिझेल दरवाढ मागे झालीच पाहिजे, अशा घोषणा देत मौदा येथील बाभरे पेट्रोल पंप वर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फुल देऊन केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या दरवाढीबद्दल गांधीगिरी आंदोलन करण्यात आले

जिल्हा राष्ट्रवादी ग्रामीण च्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ संपूर्ण जिल्ह्यात तालुकास्तरावर निवेदन देण्याचे अध्यक्ष गुजर यांनी मोहीम राबवली आहे अच्छे दिन चे स्वप्न दाखवून जनता घोषणेला बोलून निवडून दिलेल्या भाजप सरकार ने नियमित केलेली दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे एकीकडे कोरणा सारख्या आजाराच्या विळख्यात सर्वसामान्य जनता भरडली जात आहे, आशा पेट्रोल व डिझेलची दरवाढ जनतेला परवडणारी नाही.

केंद्र सरकारच्या विरोधात आंदो लकांकडून घोषणाबाजी करण्यात आली व नंतर मौदा तहसीलदार श्री प्रशांत सांगळे यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी हरिदास मेश्राम, तालुका अध्यक्ष आशिष पाटील युवक अध्यक्ष शाम वाडीभस्मे, चंद्रशेखर घोटी पट्टी, हरिभाऊ कुंभलकर, विजय पांडे हर्षद विद्रोही पवन वैद्य चेतन मेश्राम अजय पिसे संजय पसरकर, सुरज बारापात्रे, देवेंद्र वासनिक, शुभम वाडीभस्मे, राहुल सहारे योगेश करवंदे राजेश सोनकुसरे व अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते।