11एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षा रद्द करण्याची रा.वि.काँ ची मागणी, रा.वि.काँ ची मागणी त्वरित मंजूर
नागपुर: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे आज दि.28 मार्च 2019 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी नेते *जगदीश पंचबुधे* यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस *राहुल कामळे* यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू *सिद्दीविनायक काणे* यांचा घेराव करण्यात आला व चर्चा करून निवेदन देण्यात आले ज्यात येत्या 11 एप्रिल 2019 रोजी होउ घातलेल्या लोकसभेच्या निवळणुका व त्याच दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाविद्यालयीन परीक्षेचा पेपर आहे ज्यात *B.E (3rd SEM/7th SEM), B.COM (6th SEM), B.A (2nd SEM) B.E CIVIL ENGINEERING, (7th SEM)* आणि इतर विषयांच्या परीक्षा घेण्यात येणार आहे पण 11 एप्रिल 2019 रोजी नागपूर विद्यापीठ अंतर्गत नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, गोंदिया- भंडारा व इतर लोकसभा क्षेत्रात निवळणुका आहेत आणि बहुतांश महाविद्यालय हे मतदार केंद्र आहेत तर विद्यार्थी परीक्षा देणार कसा असा प्रशन कुलगुरू यांना करण्यात आला व हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आणण्यात आला जेणे करून विद्यार्थ्यांना परीक्षेला पुढे जाता कुठलीही समस्या निर्माण होता काम नये त्यावर कुलगुरू यांनी त्वरित प्रशासकीय अधिकारी यांना बोलावून आदेश दिला की येत्या 10, 11, 12 एप्रिल रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पेपर रद्द करण्यात यावे व त्याला पुढे ढकलण्यात यावा व याची माहिती सर्व प्रेस मीडिया, सर्व महाविद्यालयात तसेच विद्यापीठाच्या वेबसाईटवर समाविष्ट करण्यात यावी जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही व सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा चांगल्या प्रकारे पार पडेल अशे आदेश त्वरित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
या प्रसंगी प्रामुख्याने राष्ट्रवादी पदवीधर संघ नागपूर जिल्हाध्यक्ष *गौतम वैद्य,* नागपूर शहर अध्यक्ष *विक्रांत मेश्राम,* रा.वि.काँ नागपूर शहर उपाध्यक्ष *राहुल वाघमारे,* *प्रणय शहारे, शेखर गावंडे, राहुल कोथळे, अमोल येनगलवार, सुमेध शहारे, अमन पाटील, शहानवाज खान, दिव्या जनबंधु, अमोल गणवीर, राहुल किन्हेकर, रवि कडबे, प्रवीण मेश्राम,* इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते 11एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षा रद्द करण्याची रा.वि.काँ ची मागणी, रा.वि.काँ ची मागणी त्वरित मंजूर
