Published On : Sun, Jul 5th, 2020

इंधन दरवाढीवरोधात राष्ट्रवादी कांग्रेस च्या वतीने तहसीलदार ला निवेदन सादर

कामठी :-कोरोना महामारीच्या विळख्यात अडकलेल्या सर्वसामान्य जनतेला प्रचंड इंधन भाववाढ करून वेठीस धरणाऱ्या केंद्र सरकारच्या मोदी सरकार विरोधात काल राष्ट्रवादी कांग्रेस च्या वतीने कामठी शहर कार्याध्यक्ष सुरेश अढाऊ यांच्या नेतृत्वात तहसिलदार अरविंद हिंगे यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय बाजारात कचच्या तेलाच्या किमती निच्चांकी पातळीवर खाली आले असताना मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही उलट सलग 25 दिवसापासून पेट्रोल, डिझेल च्या किमतीत सतत वाढ करोत आहे .केंद्र सरकार त्यावर कराची आकारणी करत आहे. कोरोना मुळे सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे त्या दरवाढी च्या विरोधात आज केंद्र सरकारच्याया अन्यायी इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी कांग्रेस च्या वतीने तहसीलदार अरविंद हिंगे यांना सामूहिक निवेदन देऊन जर दरवाढ कमी झाली नाही तर यापुढे मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा सुद्धा देण्यात आला.

निवेदन देताना राष्ट्रवादी कांग्रेस चे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे, कामठी शहर कार्याध्यक्ष सुरेश अढाऊ, कुंदन मेश्राम, इर्शाद शेख, मनोज लखोटीया, जयदास रंगारी, अनिरुद्ध तांबे, प्यारे साहब, शेख निजामुद्दीन, शाहीन परवीन , नर्गिस तबससुम,मंजूर अहमद, मन्सूर अहमद आदी पदाधिकारि व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी