Published On : Wed, Mar 20th, 2024
By Nagpur Today Nagpur News

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची ताकद वाढली; सुनील माने यांचा पक्षात प्रेवश

Advertisement

औंध : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुनील माने यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत माने यांनी आज सकाळी मोदी बागेतील त्यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेश केला.

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जयदेवराव गायकवाड, शहराध्यक्ष प्रशांत जगताप,पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे, राष्ट्रवादी लिगल सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. भगवानराव साळुंखे आदी उपस्थित होते.

माने यांच्यासह माजी नगरसेवक आरिफ बागवान, माजी पंचायत समिती सदस्य सुनील खेडेकर यांनीही आज शरद पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूप आनंदी असल्याचे माने म्हणाले. पवार यांच्या अनुभवी नेतृत्वातच महाराष्ट्राचा आणि पुणे शहराच्या शाश्वत विकास होऊ शकतो ही माझी धारणा असल्याने मी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला, असेही ते म्हणाले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.