Published On : Sat, Sep 2nd, 2023
By Nagpur Today Nagpur News

संधी चे सोने करून दाखविण्यासाठी सज्ज व्हा- खा. प्रफुल्ल पटेल यांचा कार्यकर्त्याना सल्ला

Advertisement

आघाडी मध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेस ला दुय्यम स्थानी ठेवले जात असे, आम्ही देखील मोठ्या मनाने प्रामाणिक पणे स्वीकारत होतो. यामुळे आमचे कार्यकर्ते मागे पडायचे, ही खंत असायची. मात्र तो भूतकाळ समजून सर्व काही विसरून सर्व सामान्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयातून संधी प्राप्त होणार आहे. या संधीचे सोने करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असा सल्ला खा.श्री प्रफुल पटेल यांनी दिला.

नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प मेळाव्याला संबोधित करतांना ते बोलत होते. खा श्री प्रफुल पटेल पुढे म्हणाले, मागील दोन महिन्यांमध्ये एक वेगळा विचार करण्याचा प्रसंग का आला भूतकाळात पक्ष वाढीसाठी जे प्रसंग आले त्यात आम्ही वरचढ असूनही दुय्यम स्थान देण्यात आले नेहमी आम्हाला आघाडी टिकवण्यासाठी माघार घ्यावी लागली आम्ही पक्षाच्या वाढीसाठी जनतेच्या हितासाठी व विकासासाठी आज जो निर्णय घेतला आहे तो निर्णय आपल्या सर्वांच्या भल्यासाठी असून आम्ही कधीही फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांशी तडजोड करणार नाही याची ग्वाही श्री प्रफुल पटेल यांनी दिली

नागपूर जिल्ह्यात व शहरात पक्ष वाढीसाठी आगामी काळात जास्तीत जास्त जागा घेऊन पक्षाचा विस्तार व संघटन करण्याचा आश्वासन श्री पटेल यांनी दिले. जे गेले त्यांची चिंता न करता जे सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन विदर्भात पक्षाचा विस्तार व वाढीसाठी कार्यकर्त्यांना ताकतीने संधी देण्याचे काम करू असे आश्वासन श्री प्रफुल पटेल यांनी दिली

ढोल ताशे व फटाके फोडून खा.श्री पटेल यांचे भव्य स्वागत

Advertisement

आज नागपूर येथे खासदार श्री प्रफुल पटेल यांचा मोठ्या उत्साहात भव्य स्वागत करण्यात आला. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हील लाईन नागपूर येथे कार्यकर्त्यांनी भव्य संकल्प कार्यकर्ता मेळाव्यात ढोल ताशे व फटाके फोडून कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने जोश व उत्साहात उपस्थिती दर्शवून खासदार श्री प्रफुल पटेल व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत खंबीरपणे उभे आहोत असा संकल्प करण्यासाठीं हा मेळावा आयोजित करण्यात आला.

मेळाव्याला खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत राज्याचे मंत्री श्री धर्मराव बाबा आत्राम, सर्वश्री राजेंद्र जैन, सुनिल फुंडे, शिवराज बाबा गुजर, प्रशांत पवार, श्रीकांत शिवणकर, अनिल अहिरकर, आभा पांडे, राजुभाऊ कारेमोरे, ईश्वर बाळबुदे, राजेश माटे, अरविंद भाजीपाले, रवी पराते, नाना पंचबुधे, गंगाधर परशुरामकर, धनंजय दलाल, मधुकर कुकडे, रविकांत बोपचे, जयंत किनकर नरेश अरसडे, राजाभाऊ आखरे, भागेश्वर फेंडर, सुधाकर तिंबोडे, हरिदास मेश्राम, रवी वैद्य, आशिष पाटील, सतिश शिंदे, सोपान गभने, नरहरी देवाडे, शैलेश भुरे, कपिल वानखेडे, भुजंग भोजनकर, आनंद सोनवणे, सचिन आमले, प्रशांत अग्रवाल, विशाल खांडेकर सहित हजारोच्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता व पत्रकार बंधू उपस्थित होते.

रवि आर्य

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.