मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचाराकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे यांच्यासह अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत या दिग्गज नेत्यांचा समावेश –
राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये 20 नावांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, ब्रीज मोहन श्रीवास्तव, सुबोध मोहिते, अविनाश अदिक, संजय प्रजापती, उमाशंकर यादव, धीरज शर्मा, चैतन्य मानकर, विरेंद्र सिंग, दिपाली अरोरा यांच्यासह आणखी काही नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी होणार असून 8 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.
निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 18 जानेवारीला उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. उमेदवाराला वीस जानेवारीपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.