Published On : Fri, Dec 28th, 2018

नगरमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस

सात दिवसात लेखी खुलासा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवा- नवाब मलिक

मुंबई : अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणूकीमध्ये भाजपासोबत जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

अहमदनगरमध्ये महानगरपालिका निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समविचारी पक्षांशी आघाडी करुन लढवली होती.महापौर-उपमहापौर निवडणूकीमध्ये भाजप-शिवसेना या पक्षांना पाठींबा देवू नये अथवा त्यांच्या बाजुने मतदान करु नये असे स्पष्ट आदेश पक्षाच्यावतीने असतानाही भाजपाला मतदान करुन पक्षादेश डावळला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

त्यामुळे पक्षादेशाचे पालन न केल्याच्या कारणामुळे कायदेशीर कारवाई का करण्यात येवू नये असे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे शिवाय याबाबतचा खुलासा येत्या सात दिवसामध्ये करावा असेही त्या नगरसेवकांना कळवण्यात आले असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.