Published On : Thu, Nov 22nd, 2018

नागपूरचे आमदार प्रकाश गजभिये विधानभवनात छत्रपती शिवाजी महारांच्या पोशाखात एन्ट्री


मुंबई : मराठा, धनगर आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात होत असलेल्या दिरंगाईबद्दल राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये यांनी शिवरायांच्या वेशात येऊन अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.

भाजपने सत्तेवर येण्याआधी विविध आश्वासने दिली. मराठा, धनगर समाजाला आरक्षण देण्याचाही यात समावेश होता. मात्र ती पूर्ण झाली नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे काम अजून सुरु झालेले नाही. महागाई वाढत आहे.

 

Advertisement

शेतकरी सरणात उडी मारुन आत्महत्या करीत आहेत. औषधांचे दर गगनाला भिडले आहेत. ही स्थिती सरकारने वेळीच नियंत्रणात आणावी अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement