Published On : Sat, Sep 9th, 2017

‘नया भारत- हम करके रहेंगे’ या छायाचित्र प्रदर्शनाचा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा १० सप्टेंबर रोजी समारोप

Advertisement


नागपूर: संसदीय कामकाज मंत्रालय, जाहिरात व दृश्य प्रचार संचलनालय (डीएव्हीपी), तसेच राईटस लिमिटेड (रेल इंडिया टेक्नीकल अँड इकोनॉमीकल सर्विस- रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत एक सार्वजनिक उपक्रम) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने स्थानिक राणी कोठी, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे आयोजित ‘नया भारत- हम करके रहेंगे’ या ६ ते १० सप्टेंबर २०१७ दरम्यान आयोजित पाच – दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाचा तसेच सांस्‍कृतिक कार्यक्रमाचा समारोप उद्या १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. याप्रसंगी राईटस लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहे.

भारत छोडो आंदोलनाच्या ७५व्या वर्षापूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील ‘नया भारत- हम करके रहेंगे’ (‘न्यू इंडिया-वी रिझॉल्व्ह टू मेक’ ) ही या प्रदर्शनाची मुळ संकल्पना होती. या प्रदर्शनाच्या अनुषंगाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याविषयी व शासनाद्वारे नव्या भारताच्या (न्यू इंडीया) निर्मितीसाठी घेतलेल्या उपक्रमांसंदर्भातल्या विविध विषयांवरील प्रश्नमंजुषा, चित्रकला आणि निबंध लेखन स्पर्धांमध्ये नागपूरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना पुढील पाच वर्षात २०२२ पर्यंत एक नवा भारत घडविण्‍याची ‘संकल्‍प से सिद्धि-नए भारत का संकल्‍प’ ही शपथही देण्यात आली.


डीएव्हीपी द्वारे (जाहिरात व दृश्य प्रचार संचलनालय ) तयार केलेल्या या छायाचित्र प्रदर्शनात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या गीत आणि नाटक विभागाद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले गेले. या प्रदर्शनास अनेक नागरिकांनी भेट देऊन भारताच्या स्वातंत्र्यलढ्याविषयीची माहिती जाणून घेतली.