| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jul 31st, 2017

  गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील मौजा वेलमागड गावातील लोकांनी तोडले नक्षल स्मारक…

  Naxal Smarak
  गडचिरोली:
  नक्षल्यांकडून २८ जुलै ते ३ अॉगस्ट दरम्यान पाळण्यात येणाऱ्या नक्षल बंद दरम्यान अपर पोलीस अधिक्षक अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक प्राणहिता नक्षलविरोधी अभियान राबवित असताना एटापल्ली तालुक्यातील मौजा वेलमागड गावातील लोकांनी आपला नक्षल सप्ताहाला प्रचंड विरोध दर्शवित गावाच्या बाहेर उभारण्यात आलेले नक्षल स्मारक तोडण्यात स्वयंस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

  यापुढे नक्षलवाद्यांच्या बंदला आता आम्ही प्रतिसाद देणार नाही व जिल्हयातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार आदिवासी बांधवांनी केला. त्याचबरोबर नक्षल्यांच्या नाहक त्रासाला कंटाळलेल्या आदिवासींनी नक्षल गावबंदी करण्याचा निर्णयही घेतला आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145