Published On : Thu, Jul 25th, 2019

नवोदय अर्बन बँक घोटाळा: धवड दाम्पत्याच्या जामिनावर निर्णय राखून

Advertisement

नागपूर : नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आर्थिक घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) व त्यांच्या पत्नी किरण (५९) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला व निर्णय जाहीर करण्यासाठी ३१ जुलै ही तारीख निश्चित केली.

अशोक धवडबँकेचे अध्यक्ष तर, किरण धवड संचालिका आहेत. बँकेत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी १५ मे २०१९ रोजी श्रीकांत सुपे (५७) यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-अ यासह एमपीआयडी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

Gold Rate
09 May 2025
Gold 24 KT 96,800/-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

२०१४-१५ मध्ये बँकेतून चार कोटी तीन लाख रुपयांची उचल करण्यात आली व बनावट कागदपत्रांच्या आधारे ती रक्कम बँकेला परत केल्याचे दाखविण्यात आले होते. अशा विविध प्रकारे बँकेत घोटाळा करण्यात आला. धवड दाम्पत्यातर्फे अ‍ॅड. मोहन सुदामे तर, सरकारतर्फे अ‍ॅड. नीरज जावडे यांनी कामकाज पाहिले.

Advertisement
Advertisement