नागपूर. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील खो-खो स्पर्धेमध्ये नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर संघाने पुरुष गटात आगेकूच केली आहे. नवमहाराष्ट्र संघाने श्री. चंदनशेष सावना संघाचा 26-20 अशा फरकाने पराभव करून विजय मिळविला. अन्य सामन्यात विदर्भ क्रीडा मंडळ गडचिरोली संघाने स्लम क्रीडा राळेगाव (30-18) संघाला तर विदर्भ क्रीडा काटोल संघाने ह्युमॅनिटी स्पोर्टिंग परतवाडा (28-08) संघाला आणि विदर्भ क्रीडा नागपूर संघाने विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ नागपूर (24-10) संघाला मात देउन विजय मिळविला. सिटी पोलिस नागपूर संघाने महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर (32-24) संघाचा 8 गड्यांनी पराभव केला.
महिलांच्या स्पर्धेत श्रीराम क्रीडा मुसेवाडी संघाने तालुका क्रीडा वरोरा (16-12) संघाचा एक डाव 6 गड्यांनी पराभव करुन स्पर्धेत आगेकूच केली. अन्य सामन्यामध्ये नवक्रांतिज्योत चंद्रपूर संघाने तुळजा भवानी क्रीडा मंडळ परतवाडा (17-16) संघाचा चुरशीच्या सामन्यात एक डाव आणि एका गड्याने पराभव करुन आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. विदर्भ युथ काटोल ने क्रीडा भारती यवतमाळ (39-10) ला एक डाव 29 गड्यांनी मात दिली.
सबज्यूनिअर गटात मुलांच्या स्पर्धेत महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर ने श्रीराम क्रीडा मंडळ मुसेवाडी (24-20) संघाचा तर विदर्भ क्रीडा मंडळ काटोल संघाने विद्यार्थी क्रीडा मंडळ नागपूर (12-10) संघाचा पराभव करुन विजय मिळविला. मुलींच्या स्पर्धेत छत्रपती युवक क्रीडा मंडळ नागपूर संघाने आर. एस मुंडले स्कूल नागपूर (24-2) संघाला नमवून विजय संपादित केला.
खासदार क्रीडा महोत्सव : विदर्भस्तरीय खो खो स्पर्धा
मानकापूर क्रीडा संकुल
निकाल
पुरुष
1. नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर मात श्री. चंदनशेष सावना (26-20)
नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर एक डाव, 6 गड्यांनी विजयी
2. तुळजाई परतवाडा मात विदर्भ बुनियादी नागपूर (43-12)
तुळजाई परतवाडा एक डाव 31 गड्यांनी विजयी
3. विदर्भ क्रीडा मंडळ गडचिरोली मात स्लम क्रीडा राळेगाव (30-18)
विदर्भ क्रीडा मंडळ गडचिरोली एक डाव 12 गड्यांनी विजयी
4. विदर्भ क्रीडा काटोल मात ह्युमॅनिटी स्पोर्टिंग परतवाडा (28-08)
विदर्भ क्रीडा काटोल एक डाव 20 गड्यांनी विजयी
5. विदर्भ क्रीडा नागपूर मात विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ नागपूर (24-10)
विदर्भ क्रीडा नागपूर एक डाव 14 गड्यांनी विजयी
6. सिटी पोलिस नागपूर मात महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर (32-24)
सिटी पोलिस नागपूर 8 गड्यांनी विजयी
महिला
1. श्रीराम क्रीडा मुसेवाडी मात तालुका क्रीडा वरोरा (16-12)
श्रीराम क्रीडा मुसेवाडी एक डाव 6 गड्यांनी विजयी
2. नवक्रांतिज्योत चंद्रपूर मात तुळजा भवानी क्रीडा मंडळ परतवाडा (17-16)
नवक्रांतिज्योत चंद्रपूर एक डाव एका गड्याने विजयी
3. विदर्भ युथ काटोल मात क्रीडा भारती यवतमाळ (39-10)
विदर्भ युथ काटोल एक डाव 29 गड्यांनी विजयी
14 वर्षाखालील (सबज्यूनिअर) मुले
1. महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर मात श्रीराम क्रीडा मंडळ मुसेवाडी (24-20)
महाराष्ट्र क्रीडा मंडळ 4 गुणांनी विजयी
2. विदर्भ क्रीडा मंडळ काटोल मात विद्यार्थी क्रीडा मंडळ नागपूर (12-10)
विदर्भ क्रीडा मंडळ 2 गुणांनी विजयी
14 वर्षाखालील (सबज्यूनिअर) मुली
1. छत्रपती युवक क्रीडा मंडळ नागपूर मात आर. एस मुंडले स्कूल नागपूर (24-2)
छत्रपती युवक क्रीडा मंडळ 22 गुणांनी विजयी