Published On : Wed, Aug 19th, 2020

बॉयफ्रेंडसोबत पळून गेलेल्या मुलीवर मित्रांनी केला बलात्कार

Advertisement

नवी मुंबई: बॉयफ्रेंडसोबत पळून गेलेल्या १७ वर्षीय मुलीवर त्याच्या मित्रांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील खारघरमध्ये घडली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तिघा आरोपींचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली होती. या मुलीला खारघरमधील फ्लॅटमध्ये नेले होते. तिथे तिला पावडर म्हणून ड्रग्ज देण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. सध्या तिचे समुपदेशन केले जात आहे.

१५ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेची माहिती तिने याज्ञिका फॉउंडेशनच्या अनिता कारंडे यांना दिली

Advertisement

‘दरवेज याने खारघर येथील एका फ्लॅटमध्ये नेले. तिथे त्याने पावडरसारखं काहीतरी खायला दिले. त्यामुळे अशक्तपणा वाटत होता. दरवेजचे दोन मित्र तिथे आले. त्यातील एकाने बलात्कार केला. तर एकाने विनयभंग केला. दरवेज हा देखील तिथे होता. मात्र, त्याने मित्रांना रोखले नाही,’ असं तिने समुपदेशकांना सांगितलं. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, तिघा आरोपींचा शोध घेत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.