मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेस, युवक काँग्रेस (INC)आणि समविचारी पक्षाच्या युवकांची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयामध्ये आज पार पडली.
येत्या काळामध्ये सरकारच्या धोरणाविरोधात मुंबईमध्ये मोठे आंदोलन उभे करण्याचा निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आला.
ही बैठक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे (INC) युवक अध्यक्ष सत्यजित तांबे, मुंबई अध्यक्ष गणेश यादव, उपाध्यक्ष सुरज ठाकूर, राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष रविकांत वरपे, शैलेश मोहिते, सरचिटणीस सुरज चव्हाण, मुंबई अध्यक्ष निलेश भोसले यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेस, युवक काँग्रेस (INC) आणि समविचारी पक्षांचे मुंबई जिल्हाध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
