कोल्हापूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित शिवसेना शिंदे गटाचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात १५ ते १७ तारखेला पार पडणार आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.
राज्य सरकारच्या निधीतून सुरू असलेल्या विकास कामांची गती वाढवावी, त्यातील काही कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्याची तयारी करावी, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.तसेच कोल्हापूर शहरासाठी राबविण्यात आलेल्या काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेचे लोकार्पणदेखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात येईल, असा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले.