Published On : Thu, Sep 20th, 2018

नॅसकॉमच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई: माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत संस्था नॅसकॉमच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी राज्याचे फिनटेक धोरण, माहिती तंत्रज्ञानाचा उद्योग क्षेत्रात वाढता वापर या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली.

यावेळी नॅसकॉमच्या अध्यक्षा देबजानी घोष, सहसंस्थापक हरिश मेहता, उपाध्यक्ष केशव मुरुगेश, उपाध्यक्ष के.एस. विश्वनाथन, वरिष्ठ संचालक संदीप बहल, संचालक डॉ. चेतन सामंत उपस्थित होते.

नॅसकॉमच्या टेक्नॉलॉजीमार्फत राज्यातील दोन कोटी युवकांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण देण्याचे लक्ष निर्धारित केले असल्याची माहिती श्रीमती घोष यांनी दिली. राज्यातील इतर प्रकल्पांसाठी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य करण्याची तयारीही यावेळी त्यांनी दर्शविली.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भुषण गगरानी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.