नागपूर : युनायटेड जर्नालिस्ट फोरम या राष्ट्रीय पत्रकाराच्या संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदी पत्रकार नरेंद्र वैरागडे यांची निवड करण्यात आली. वैरागडे मागील तीस वर्षा पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. युनायटेड जर्नालिस्ट फोरम (UJF) ही देशभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी व स्वाभिमानासाठी लढा लढणारी पत्रकार संघटना आहे.
युनायटेड जर्नालिस्ट फोरम ही संघटना पत्रकार, संघटनेचे पदाधिकारी यांचा स्वाभिमान कायम ठेवत पत्रकार आणि त्यांचे कुटुंब यांचे आरोग्य,पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षितता, पत्रकारांना कायदेशीर मार्गदर्शन,पत्रकारांचे घर,पत्रकारांना इन्शुरन्स,पत्रकारांचे शिक्षण व प्रशिक्षण,पत्रकारांचा पार्ट टाईम व्यवसायासाठी मदत, पत्रकारांसाठी स्वतंत्र राष्ट्रीय महामंडळ पत्रकारांची नोंदणी, डिजिटल मिडीयाच्या पत्रकारांची नोंदणी, नविन कायद्याबाबत लढा यावर काम करते.
Published On :
Sat, Mar 23rd, 2024
By Nagpur Today
युनायटेड जर्नालिस्ट फोरमच्या विदर्भ अध्यक्षपदी नरेंद्र वैरागडे यांची निवड
Advertisement