Published On : Sat, Jun 8th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नरेंद्र मोदी 9 जूनला तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधान पदाची शपथ;7 देशांच्या दिग्गज नेत्यांना आमंत्रण

Advertisement

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर भाजप नेतृत्वातील एडीए सरकार स्थापन करणार आहे. उद्या म्हणजेच ९ जूनला नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने 293 जागा जिंकल्या आहेत. यात एकट्या भाजपच्या 240 जागा आहेत. या शपथ विधी समारंभासाठी बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरीशस आणि सेशेल्सचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Gold Rate
09 May 2025
Gold 24 KT 96,800/-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या, नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) कमांडो, ड्रोन आणि ‘स्नायपर्स’ तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, परदेशी पाहुणे राजधानीतील लीला, आयटीसी मौर्य, ताज, ओबेरॉय आणि क्लेरिजेस हॉटेल्समध्ये थांबणार आहेत. यामुळे हे हॉटेल्सच्या परिसरातही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

सुरक्षा व्यस्थेसंदर्भात अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्यवर ज्या मार्गांचा वापर करतील त्या मार्गावर ‘स्नायपर’ आणि सशस्त्र पोलीस दलाचे कर्मचारी तैनात असतील. तसेच नवी दिल्ली जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी ड्रोनही तैनात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे .

‘हे’ दिग्गज नेते राहणार उपस्थित-
श्रीलंकेचे राष्ट्रपती – रानिल विक्रमसिंघे , मालदीवचे राष्ट्रपती – डॉ मोहम्मद मुइज्जू सेशेल्सचे, उपराष्ट्रपती – अहमद अफीक ,बांगलादेशच्या पंतप्रधान – शेख हसीना, मॉरीशसचे पंतप्रधान – प्रविंद कुमार जुगनुथ, नेपाळचे पंतप्रधान – पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ ,भूतानचे पंतप्रधान – शेरिंग टोबगे आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Advertisement