मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून खासदार झालेले नारायण राणे अडचणीत सापडले आहे. राणे यांच्या विजयाला आव्हान देण्याचे संकेत ठाकरे गटाने दिले होते. राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे.
Featured Products
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी या निवडणुकीत मते विकत घेतली. त्यांनी मतदारांना धमकावले आणि विजय मिळवल्याचा आरोप शिवसेना नेते विनायक राऊतांनी केला होता. आता त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.
त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपकडून अनेक गैरप्रकार करण्यात आले. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी देखील करण्यात आल्या. मात्र, त्यावर काहीच कारवाई झाली नाही म्हणून ही याचिका करण्यात आली असल्याचे विनायक राऊत म्हणाले.
Advertisement









