Published On : Thu, Sep 15th, 2022
By Nagpur Today Nagpur News

४२ दिवसापासून अंतिम संस्कार न करता बापाने केला मुलीचा मृतदेह जतन…

Advertisement

पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने पुनर्वच्छेदनाच्या मागणीसाठी गावकर्यांच्या मदतीने उभा केला आहे लढा…

मृत्युनंतर एक दोन नव्हे तर तब्बल ४२ दिवस उलटुन देखील एका बापाने आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी तिचा अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह मीठाच्या खड्यात पुरुण ठेवला आहे. मुलीवर बलात्कार होवुनही तिचा खुण झाला असतांना पोलीसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा नोदवुन घेतला, इतकच नव्हे तर शवविच्छेदन अहवालात देखील तिच्यावर अत्याचारांबाबत काहीही तपासणीच करण्यात आली नाही. त्यामुळेच याबापाने ग्रामस्थांच्या मदतीने आता व्यवस्थे विरोधातच लढा सुरु केला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील खडक्या येथील रहिवासी आंतरसिंग काल्या वळवी यांची विवाहीत मुलगी रंजीला हिला तालुक्यातील वावी येथील रहिवाशी रणजीत ठाकरे आणि अन्य एकजण बळजबरीने गाडीवर बसवुन ०१ ऑगस्ट २०२२ ला गावाबाहेर घेवुन गेले. यानंतर तिचा तिच्या नातलगाला आलेल्या फोन मध्ये तिच्या सोबत रणजीतसह चार जणांनी चित्रपटाप्रमाणे कुकर्म करत असल्याचे तिने सांगत ते मला मारुन टाकतील असे रंजीलाने सांगितले. काही काळातच तिने वावी येथील एका आंब्याच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केल्याचा तिच्या कुटुंबीयांना फोन आला.

तिचे कुटुंबीय घटनास्थळी पोहचण्याआधीच वावी गावातील लोकांच्या मदतीने तिचा मृतदेह उतरुन घेत पुरावे नष्ट केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलीसांना सांगुन देखील रंजीलाच्या शवविच्छेदन अहवालात याबाबत कुठलीही तपासणी झाली नसल्याचे समोर आले आहे. तिला फाशी दिली गेली असुन पोलीसांच्या मदतीने तिची आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न चालला असल्याचा आरोप तिच्या वडीलांसह कुटुबीयांनी केला आहे.

Advertisement

शवविच्छदेनाच्या अहवालानंतर पोलीसांनी या घटनेप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा नोदवुन घेतला. आणि या प्रकरणात संशयीत रणजीत ठाकरे सह तिंघाना अटक केली. मात्र मुलीवर बलात्कार होवुन तिची हत्या झाली असतांना पोलीसांच्या या भुमिकेमुळे मुलीचे प्रेत अंतिम संस्कारासाठी ताब्यात मिळाल्यानंतर आंतरसिंग काल्या वळवी यांनी त्याला अग्निदाग देवुन त्याचे अंतीम संस्कार केले नाही. त्यांनी आपल्या घरा शेजारच्या शेतात खड्डा करुन त्याठिकाणी मिठातच आपल्या मुलींच्या मृतदेहाला पुरले आहे. या साऱया कठीण प्रसंगी खडक्याचे ग्रामस्थ देखील वळवी कुटुंबीयासमवेत भक्कम पणे पाठीमागे उभे आहेत.

शनसह थेट पोलीस अधिक्षक कार्यालय गाठुन आपल गाऱहाणे मांडले आहे. तर ठाणे येथील सामाजीक कार्यकर्त्यां परिणीती पोंक्षेंच्या मदतीने थेट मुख्यमंत्र्याच्या कानावरही अंतीम संस्कार झाले नसल्याची बाब निदर्शनास आणुन दिली आहे. मुळातच मुलींच्या कुटुंबीयांची जर मागणी होतीच तर प्रशासनाने त्यापद्धतीने तहसिलदार अथवा न्यायदंडाधिकारी यांच्या परवानगीने तिचे पुर्न शवविच्छेदन करणे क्रमप्राप्त होते. मात्र या साऱया प्रकरणात नेमक पाणी कुठे मुरत आहे. असाच प्रश्न देखील उपस्थित होत आहे. दरम्यान पोलीसांनी याबाबत बोलतांना तपासाच्या अनुशंगाने जे तथ्य समोर आले त्यानुसार अतिरीक्त कलमांचा या गुन्ह्यात समावेश करण्यात आला असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलीस अधिक्षकांची ग्रामस्थांनी भेट घेतल्यानंतर या प्रकरणात पुर्न शवविच्छेदन करण्याच्या सुचना देखील त्यांनी धडगाव पोलीस ठाण्याला दिल्या आहे. याच नुसार पोलीसांनी तालुका दंडाधिकारी यांना पत्र लिहुन पुर्न शवविच्छेदनाची मागणी देखील केली आहे.

रंजीलाची मृत्यु आधी व्हायरल झालेली ऑडीओ क्लीप ची तपासणी करुन त्यात जर तथ्य असेल तर त्याबाबतच पोलीसांनी आधीच ठोस पावले उचलणे गरजेचे होते. अशातच तिच्या आत्महत्या झालेल्या फोटोमधुन देखीलकाही तात्रींक बाबी उपस्थित करत प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे. त्यामुळेच शवविच्छेदन अहवाला नंतर काहीही निघो मात्र रंजीलाच्या घरच्यांची अतिशय साध्या आणि सरळ मागणीची दखल प्रशासन कधी घेणार हाच प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.