Published On : Fri, Mar 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात नंदनवन पोलिसांची धडाकेबाज कारवाई : खुनाच्या प्रयत्नातील तीन आरोपी जेरबंद!

Advertisement

नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक करत मोठी कामगिरी बजावली आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर आळा बसला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदनवन झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाची ओळख प्रिया उर्फ सपना मेश्राम (वय २०) हिच्याशी झाली होती. यापूर्वी प्रियाची मैत्री संकेत वंजारी याच्यासोबत होती. मात्र त्याच्या वर्तनामुळे तिने संबंध तोडले. याच कारणावरून आरोपीने फिर्यादीवर वैर धरले.

२४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास फोनवरून आरोपींकडून शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. त्यानंतर काही वेळातच आरोपींनी केडीके कॉलेज रोड परिसरात फिर्यादीला गाठले. आरोपी वैभव तन्नेलवार याने दिलेल्या धारदार शस्त्राने संकेत वंजारी याने फिर्यादीच्या गळ्यावर वार करत त्याला गंभीर जखमी केले. जखमी तरुणावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.

दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून संकेत वंजारी, वैभव तन्नेलवार आणि तुषार पळस्तपुरे या तिघांना अटक केली. तपासादरम्यान तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले असून ते इतर गंभीर गुन्ह्यांमध्येही वाँटेड होते.

Advertisement

ही कारवाई पोलीस उपआयुक्त रश्मिता राव, सहायक पोलीस आयुक्त प्रदीप शिरस्कर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges