Published On : Sat, May 26th, 2018

नाना पटोले खूपच अहंकारी व्यक्ती : नितीन गडकरी

Nitin Gadkari 1
भंडारा: आपल्याला जातीपातीच्या नावाने नाही तर केवळ विकासाच्या नावाने भंडाऱ्याची पोटनिवडणूक जिंकायची आहे. ज्यांच्यामुळे ही पोटनिवडणूक जनतेवर लादली गेली आहे. नाना पटोले हे खूपच अहंकारी व्यक्ती आहे. भाजप या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव करुनच दाखवणार. तसेच, साकोली क्षेत्रातूनही त्यांचे राजकारण संपविल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी यांची भंडारा येथे रेल्वे ग्राउंडवर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. या सभेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते.

यावेळी गडकरी म्हणाले, की ‘मागील ४ वर्षात परिवहन मंत्री म्हणून देशात पहिल्यादांच १४ पदरी रस्त्यांची निर्मिती केली. तसेच, येणाऱ्या काळात या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी भंडारा-नागपूर मेट्रो सुरू करण्याचे प्रयत्न सुरु आहे. मागील काँग्रेस सरकारमुळे देशातील शेतकऱ्यांची फारच बिकट अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांसाठी त्या सरकारने काहीही केले नाही. मात्र, आमच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी भविष्याच्या योजना बनविल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे तनसापासून इथेनॉल बनविण्याचे कारखाने सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन नक्की येतील.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement