Published On : Thu, Nov 9th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील कुख्यात गँगस्टर तिरूपती भोगेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Advertisement

नागपूर : जरीपटका पोलिसांनी शहरातील कुख्यात गँगस्टर तिरुपती ऊर्फ रुपेश बाबुराव भोगे याला अटक केली. न्यायालयाने भोगेला ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तिरूपतीच्या अटकेमुळे टोळीतील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, गँगस्टर तिरुपती ऊर्फ रुपेश बाबुराव भोगे यांच्यावर अनेक गंभीर रूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

धान्य, सट्टाजुगार आणि गांजा तस्करीत भोगे सक्रिय आहे.कुख्यात सुमीत ठाकूरने कमल नाईक नावाच्या युवकाचे अपहरण करून लुटमार केली होती. त्या कमल नाईकला तिरूपती भोगेने धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तिरूपतीवर गुन्हा दखाल करण्यात आला आहे. तिरूपती भोगेच्या अटकेनंतर पोलिसांनी सर्व बाजूनी तपास सुरु केला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.