Published On : Tue, Mar 5th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कर्मचारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर !

Advertisement

नागपूर: कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांकरिता हा संप पुकारला.

नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात 660 मेगावॅटचे एकूण तीन संच आहे. येथे रोज 1960 मेगावॅट विजेची निर्मिती होते. या संपात येथील सहा हजार कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले असल्याने पुढील काळात येथील वीज निर्मितीवर याचा परिणाम होण्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विद्युत केंद्रातील कंत्राटी कर्मचारी संपावर महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये सुमारे 42 हजार कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांना वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर सामावून घ्या, हे कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका, यासह इतरही मागण्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आहेत. त्या मान्य होत नसल्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 28 आणि 29 फेब्रुवारीला लाक्षणिक संप केला होता आणि त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास 5 मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता. त्यानुसार, आता कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा काम बंदची हाक दिली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.