नागपूर : शहरातील कडबी चौकात भर रस्त्यावर ‘आपली बस’ शनिवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास जाळून खाक झाली. बसचा क्रमांक एसएच ३१-सीए-६११० असून शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती आहे. ही बस खापरी डेपोची होती. अग्निशमन विभागाला घटनास्थळावरून आग लागण्याचा कॉल आल्याबरोबर सूगतनगर अग्निशमन केंद्राची गाडी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र आपली बसचे व्यवस्थापक यांनी दिलेल्या माहितीनुसार ही बस सीएनजीवर होती.ही बस ५ लाख रुपये किंमतीची होती. आगीत बसचे ८ सीएनजी टॅँक, टायर, सीटसह संपूर्ण बसच खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवितहाणी झालेली नाही.