Published On : Tue, Feb 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील आयकॉनिक पूनम टॉवर अखेर पाडणार; एन. कुमार यांचे हायकोर्टात स्पष्ट आश्वासन!

१ आठवड्यात पाडकामास सुरुवात, २ महिन्यांत पूर्ण कारवाई
Advertisement

नागपूर – नागपूरातील विधिमंडळ भवनासमोर असलेल्या आयकॉनिक पूनम टॉवरबाबत मोठी आणि निर्णायक घडामोड समोर आली आहे. टॉवरचे मालक एन. कुमार सोमवारी उच्च न्यायालयात प्रत्यक्ष हजर झाले असून, २ महिन्यांच्या आत संपूर्ण पूनम टॉवर पाडून काढण्याचे ठोस आश्वासन त्यांनी न्यायालयाला दिले आहे.

न्यायालयाला माहिती देताना एन. कुमार यांनी येणाऱ्या १ आठवड्यात पाडकामाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे स्पष्ट केले. त्यांच्या वैयक्तिक उपस्थितीची आणि दिलेल्या वेळापत्रकाची नोंद न्यायालयाने घेतली असून, यापुढे या प्रकरणात आश्वासनांची अंमलबजावणी काटेकोरपणे तपासली जाण्याची शक्यता आहे.

Gold Rate
Feb 10th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,56,800/-
Gold 22 KT ₹ 1,45,800 /-
Silver/Kg ₹ 2,61,300 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विधानभवनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने टॉवर पाडण्याची मागणी-
विधानभवनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पूनम टॉवर पाडण्याची मागणी करत याचिका दाखल करण्यात आली होती. सुरुवातीला या पाडकामाला विरोध करणारे एन. कुमार अखेर न्यायालयासमोर नरमले असून, टॉवर पाडण्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान, पाडकामाची अचूक कार्यपद्धती, सुरक्षाव्यवस्था, मलबा विल्हेवाट, वाहतूक व्यवस्थापन, पर्यावरणीय बाबी आणि महापालिकेसह इतर यंत्रणांशी समन्वय यासंदर्भातील सविस्तर आराखडा अद्याप सादर झालेला नाही.

पाडकामाच्या प्रगतीचा अहवाल पुढील सुनावणीवेळी सादर केला जाण्याची शक्यता असून, नागपूरच्या मध्यवर्ती भागातील या मोठ्या कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement