Published On : Wed, Feb 18th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरचा डंका जगभर; ‘ब्लॅक टायगर’ छायाचित्रासाठी भारतीय छायाचित्रकाराला जागतिक सन्मान

Advertisement

नागपूर : महाराष्ट्राच्या नागपूरातून पुढे आलेल्या एका तरुणाने आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवली आहे. वन्यजीव छायाचित्रकार प्रसेनजीत यादव यांना त्यांच्या ऐतिहासिक ‘ब्लॅक टायगर’ छायाचित्रासाठी जगप्रसिद्ध संस्था National Geographic कडून “Photographer’s Photographer Award” या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकलेल्या या दुर्मिळ ‘ब्लॅक टायगर’च्या छायाचित्राने जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडवली होती. त्यानंतर प्रसेनजीत यांचे नाव आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी विश्वात चर्चेचा विषय ठरले.

Gold Rate
Feb 18 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,900 /-
Silver/Kg ₹ 2,40,700 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सिमलीपालच्या जंगलातून जगभर-
ओडिशातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान येथे अत्यंत दुर्मिळपणे दिसणाऱ्या काळ्या वाघाचे अस्तित्व अनेक वर्षे रहस्यमय मानले जात होते. २०१८-१९ दरम्यान टायगर संशोधन मोहिमेत सहभागी असताना प्रसेनजीत यांनी या अनोख्या वाघाला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. गडद काळ्या पट्ट्यांनी सजलेला हा रॉयल बंगाल टायगर क्षणार्धात जगभरातील वन्यजीव प्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरला.

नागपूर ते आंतरराष्ट्रीय ओळख-
प्रसेनजीत यादव यांनी नागपूरच्या हिस्लॉप कॉलेज मधून बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतले. तरुण वयातच त्यांनी बेंगळुरू गाठत संशोधन आणि फील्डवर्कच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली. ते बेंगळुरूस्थित NCBS (नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस) सोबत कार्यरत होते. टायगर जेनेटिक्सवरील त्यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहे.

गेल्या १५ वर्षांपासून ते जंगलात राहून वन्यजीवनाचा अभ्यास करत आहेत. सध्या ते अमेरिकेतील बर्कले (सॅन फ्रान्सिस्को) येथे संशोधन कार्यात व्यस्त आहेत.

घरातून मिळाला निसर्गप्रेमाचा वारसा-
मानद वन्यजीव रक्षक उधमसिंह यादव यांचे सुपुत्र असलेल्या प्रसेनजीत यांना लहानपणापासूनच निसर्गाची ओढ होती. वडिलांच्या कॅमेऱ्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज जागतिक सन्मानापर्यंत पोहोचला आहे. कुटुंबीयांच्या मते, जंगल हे त्यांच्यासाठी केवळ कार्यस्थळ नसून घरच आहे.

प्रसेनजीत यादव यांची ही कामगिरी नागपूरसह संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण ठरली आहे. एका छायाचित्राने सिद्ध केले की जिद्द, संयम आणि दृष्टिकोन असेल तर जग स्वतःहून दखल घेतो.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement