नागपूर : शहरालगतच्या कोराडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळी खापरखेड़ा–कोराडी मंदिर मार्गावर भरदिवसा एका व्यक्तीवर चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शेतकरी सेलिब्रेशन हॉलसमोर ही घटना घडली. एक महिला आणि एका युवकाने मिळून संबंधित व्यक्तीवर अचानक हल्ला केला. चाकूने ताबडतोब वार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र अतिरक्तस्रावामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळच्या वेळेत रस्त्यावर वर्दळ असताना घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी महिला आणि युवक यांनी स्वतःहून पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हत्येमागील नेमके कारण काय, पूर्वीचा काही वाद होता का, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या घटनेमुळे कोराडी परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...
चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate





