Published On : Thu, Jun 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरची पहिल्याच पावसात दैना; अनेक भागांत झाडे कोसळली, वाहतूक ठप्प, ३२.२ मिमी पावसाची नोंद!

Advertisement

नागपूर – नागपूर शहरात बुधवारी रात्री झालेल्या पहिल्याच जोरदार पावसाने महापालिकेच्या तयारीचे तीनतेरा वाजवले. भारतीय हवामान विभागानुसार शहरात ३२.२ मिमी पावसाची नोंद झाली असून, या तुलनेने कमी वाटणाऱ्या पावसानेही नागपूरची वाहतूक व नागरी व्यवस्था विस्कळीत केली.

शामच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आणि रात्री उशिरापर्यंत रिमझिम व मुसळधार स्वरूपात पावसाची रिपरिप सुरूच होती. जोरदार वाऱ्यांसह झालेल्या या पावसात अनेक भागांतील जुनी व कमकुवत झाडे कोसळली. झिंगाबाई टाकळी, नरेंद्र नगर, वर्धा रोड, नंदनवन, सदर, मेडिकल, त्रिमूर्ती नगर या भागांत झाडे रस्त्यावर आडवी पडल्याच्या घटना घडल्या. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी पोहोचून झाडे हटवण्याचे काम सुरू केले.

नागपूर मनपा अलर्टवर-
झाडे कोसळण्याच्या घटनांबरोबरच शहरात अनेक भागांत जलजमावाची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी नागपूर महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, महावितरण आणि वाहतूक पोलिसांना एकत्रितपणे काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निचऱ्याअभावी नागरिक हैराण-
शहरातील निचले भाग जलमय झाले असून, गटारांचे पाणी रस्त्यांवर आल्याने वाहनचालक व पादचारी दोघेही अडकले. नागरिकांनी यावर्षीही नाल्यांची सफाई फक्त कागदावर झाली असल्याचा आरोप केला आहे. अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले असून, वाहतूक मंदावली आहे.

Advertisement

पुढील ४८ तास धोक्याचे-
हवामान विभागाने यापूर्वीच विदर्भात जोरदार पावसाचा इशारा दिला होता. बुधवारी रात्री झालेला ३२.२ मिमी पाऊस हा केवळ सुरुवात असून, पुढील दोन दिवसांत नागपूरसह आसपासच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.