नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आवाहनावरून सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात मंगळवारी युवक काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. संविधान चौकात कार्यकर्त्यांनी भाजप व निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी करत ‘मतदान चोरी’चे गंभीर आरोप लावले.
युवक काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, केंद्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपने निवडणुकांमध्ये सतत गैरप्रकार केले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही भाजपने निवडणूक आयोगाच्या मिलीभगतीने सत्ता हस्तगत केली, असा आरोप करण्यात आला.
आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की, जर भाजप व निवडणूक आयोगाने लोकशाही कमकुवत करण्याचा डाव थांबवला नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. तसेच भाजप सरकारने तात्काळ सत्ता सोडावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.