Published On : Thu, Dec 26th, 2019

राज्यस्तरीय रस्सीखेच मध्ये नागपुर ला दोन सुवर्ण व एक कास्य पदक

Advertisement

कन्हान : – टग ऑफ वार असोशियन व्दारे औरंगाबाद येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय साखळी रस्सीखेच स्पर्धेत नागपुर जिल्हा संघाने ३८० किलो व ६४० किलो वजन गटात दोन सुवर्ण आणि ५६० किलो वजन गटात एक कास्य पदक प्राप्त करून नागपुर जिल्ह याचे नावलौकिक केले.

नुकत्याच औरंगाबाद येथील विभा गीय क्रीडा संकुल गारखेडा येथे संपन्न झालेल्या मिनी सबज्युनियर १३ वर्षा आतील मुले खेडाळु आनंददीप सिंग सिद्धू , तनिष्क गणेश मानकर, निकुंज विजय राठी, आयुष श्रीकृष्ण दहिफळ कर, उत्कर्ष मोतीराम रहाटे, अनंत सिंग ठाकुर, पार्थ प्रमोद माहुरे, शिवांश दिनेश सिंग, प्रशिक्षक -अमित राजेंद्र ठाकूर, व्यवस्थापक- हर्षल हुकूमचंद बढेल च्या संघाने ३८० किलो वजन गटात अंतिम सामन्यात नाशिक जिल्हा संघाला २ – ० ने पराभुत करून स्पर्धेत आपले वर्चस्व कायम करित सुवर्ण पदक प्राप्त केले.

आणि सिनियर मुले खेडाळु अमित राजें द्र ठाकुर, अभिषेक जागेश्वर सोमकुवर, क्षितिज रुपचंद सिरिया, अमित राजेंद्र बोरकर, पंकज पांडुरंग निमकर, शुभम अरुण सिंघनाथ, हेमंत मनोजसिंग चौहा न, रजत पृथ्वीराज सोमकुवर, रुद्राश मनोज मारघडे, चिन्मय सुनील भगत, प्रशिक्षक – धैर्यशील नारायणराव सुटे, व्यवस्थापक – प्रतिक राजेश पाखिड्डे या संघाने ६४० किलो वजन गटात अंतिम साखळी सामन्यात मुंबई जिल्हा संघावर सरळ पुल मध्ये २ – ० पराभव करून प्रथम क्रमांक पटकावित सुवर्ण पदक प्राप्त केले.

तसेच सिनीयर एकत्र मुला-मुलीं खेडाळु अमित राजेंद्र ठाकूर, क्षितिज रुपचंद सिरिया, पंकज पांडुरंग निमकर, अमित राजेंद्र बोरकर, प्राची अरविंद रंगारी, पुजा मुकेश बरांगे, तेहसी न सलीम नुराणी, तनुश्री सुरेश नानवटक र, शिवम रमाकांत पिंपरोडे, अंकिता राजेंद्र ठाकूर, प्रशिक्षक – धैर्यशील नाराय णराव सुटे, व्यवस्थापक – नितेश आनंद घरडे च्या संघाने ५६० किलो वजनगटात तिसर्‍या क्रमांका करीता झालेल्या साम न्यात ठाणे जिल्ह्याला पराभुत करुन कास्य पदक प्राप्त केले.

सर्व प्राविण्य प्राप्त खेळाडुंचे टग आॅफ वार फेडरेशनचे महासचिव व महाराष्ट्र टग आॅफ वार असोशिएसन च्या अध्यक्षा माधवी पाटील, महाराष्ट्र टग आॅफ वार असोशिएसन चे महासचिव जनार्दन गुपिले, दि टग आॅफ वार असो शिएसन चे अध्यक्ष सुनील भाऊ केदार, उपाध्यक्ष लक्ष्मन राठोड, सचिव धैर्यशील सुटे, कोषाध्यक्ष बबलु सोनटक्के, बिके सीपी स्कुल कन्हानचे संस्थापक राजीव खंडेलवाल, मुख्याध्यापिका कविता नाथ, पर्यवेक्षक युनिस कादरी, विनय कुमार वैद्य, आशिष उपासे, राजकुमार परिहार आदीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.