Published On : Tue, Feb 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरला महिला नेतृत्वातून नवी दिशा मिळणार;महापौर नीता ठाकरे यांचा विश्वास

नागपूर मनपा प्रशासनात ऐतिहासिक बदल,महिलांना सर्व समित्यांचे नेतृत्व


नागपूर- नागपूर महानगरपालिका मध्ये महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले असून महापौर नीता ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रमुख समित्यांची धुरा महिलांकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे महिलांकडे देण्यात आली होती. आता स्थायी समिती, परिवहन समिती तसेच इतर महत्त्वाच्या समित्यांच्या अध्यक्षपदांवरही महिलांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा थेट आणि प्रभावी सहभाग वाढवण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. प्रशासन अधिक संवेदनशील, पारदर्शक आणि लोकाभिमुख व्हावे, यासाठी महिलांच्या नेतृत्वाचा उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
भारतीय जनता पक्ष ने या निर्णयामागे महिलांच्या कार्यक्षमतेवर असलेला विश्वास अधोरेखित केला आहे. नागपूर हे राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे केंद्र मानले जाते. त्यामुळे येथे घेतलेला हा निर्णय राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दिशादर्शक ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महिलांना केवळ प्रतिनिधित्व न देता त्यांना धोरणात्मक निर्णयांमध्ये अग्रस्थान देणे, हा या उपक्रमाचा मूळ हेतू असल्याचे सांगितले जात आहे. शहर विकास, पायाभूत सुविधा, परिवहन व्यवस्था आणि सामाजिक उपक्रमांमध्ये महिलांची सक्रिय भूमिका अपेक्षित आहे.

नागपूरच्या विकासासाठी महिलांचे नेतृत्व महत्त्वाचे-
महिलांना संधी दिल्यास त्या सक्षमपणे जबाबदारी पार पाडतात, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. नागपूरच्या विकासासाठी महिलांच्या नेतृत्वातून सकारात्मक आणि ठोस निर्णय घेतले जातील.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement

Gold Rate
May 04- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,50,400 /-
Gold 22 KT ₹ 1,39,900 /-
Silver/Kg ₹ 2,47,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above