Published On : Wed, Sep 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नूडल्स खिलाने के बहाने युवतीला दुचाकीवर नेले, छेडछाडीचा आरोप

वाठोडा पोलिसांकडून आरोपीला अटक
Advertisement

नूडल्स खिलाने के बहाने युवतीला दुचाकीवर नेले, छेडछाडीचा आरोप; वाठोडा पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ वर्षीय युवतीसोबत छेडछाड केल्याचा आरोप असलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी युवतीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची १८ वर्षीय मुलगी मानसिक आजारावर उपचार घेत आहे. आरोपी यापूर्वी तक्रारदार राहत असलेल्या परिसरातील एका कुटुंबाकडे काम करत होता. त्यामुळे युवतीची आरोपीसोबत ओळख होती.

Gold Rate
Sept 29,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 47,300 /-
Gold 22 KT ₹ 1,36,5700 /-
Silver/Kg ₹ 2,22,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

२७ सप्टेंबर रोजी सकाळी आरोपीने युवतीला नूडल्स खायला देण्याच्या बहाण्याने आपल्या दुचाकीवर बसवले. त्यानंतर तो तिला परिसरातील एका मेडिकल स्टोअर्ससमोरील रस्त्यावर घेऊन गेला. तेथे आरोपीने युवतीसोबत छेडछाड केल्याचा आरोप आहे.

घरी परतल्यानंतर युवतीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी वाठोडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.