Published On : Fri, Oct 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात वाहतूक शाखेला पोलीस आयुक्तांचा दणका;१६ कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बदली; वसुलीच्या आरोपांमुळे कारवाई

Advertisement
– वसुलींच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर कारवाई; पोलीस वर्तुळात खळबळ

नागपूर : शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था आणि वाहतूक शाखेतील कथित वसुलीच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. वाहतूक शाखेतील तब्बल १६ कर्मचाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या नियुक्तीच्या ठिकाणाहून हटवून थेट पोलीस मुख्यालयात जमा करण्यात आले आहे. २३ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील आदेश जारी झाल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एमआयडीसी, सदर, सोनेगाव, कॉटन मार्केट, कळमणा, पारडी, कामठी, इंदोरा, लकडगंज आणि सीताबर्डी येथील वाहतूक शाखेशी संबंधित कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. शहरातील वाहतूक कोंडी, नियमभंग आणि जड वाहनांना निर्बंध असतानाही प्रवेश दिला जात असल्याच्या तक्रारींमुळे वाहतूक शाखेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

गेल्या काही काळात वाहतूक शाखेतील कथित वसुलीबाबतही तक्रारी झाल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर आयुक्तांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जात आहे. मात्र, अधिकृतपणे बदल्यांसाठी प्रशासकीय कारण देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईमुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, आता शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.