नागपूर : श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम नागपूर नागरिक संघ, रामनगर यांच्या वतीने गुरुवार, दि. 26 मार्च 2026 रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीचा मार्ग रामनगर चौक, गोकुलपेठ बाजार, लक्ष्मीभवन चौक, धरमपेठ कॉफी हाऊस चौक, मामा रोड, झेंडा चौक, लक्ष्मीनारायण चौक, शंकरनगर, बजाजनगर, लक्ष्मीनगर, श्रद्धानंदपेठ, व्ही.एन.आय.टी. गेट, एल.ए.डी. चौक, तिडके चौक असा राहणार असून शेवटी रामनगर राममंदिर येथे समारोप होणार आहे.
या शोभायात्रेमुळे संबंधित मार्गांवर काही काळ वाहतुकीत बदल करण्यात येणार असून नागरिकांनी दिलेल्या वेळेनुसार पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
वाहतूक बदलाचे वेळापत्रक व पर्यायी मार्ग-
– दुपारी 3 ते सायं. 6 (रामनगर चौक ते लक्ष्मीभवन चौक)रविनगर चौकातून लॉ कॉलेज चौक मार्गे वाहतूक वळविण्यात येईल. तिडके वाय पॉईंटवरून एल.ए.डी. चौक मार्गे शंकरनगरकडे वळविण्यात येईल.
– सायं. 6 ते 7 (धरमपेठ कॅफे हाऊस चौक ते झेंडा चौक)लॉ कॉलेज चौकातून भोले पेट्रोल पंप चौक मार्गे पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. तसेच धरमपेठ वाय पॉईंटवरून अलंकार चौक/अजित बेकरी टी पॉईंटमार्गे वाहतूक वळविली जाईल.
– सायं. 7 ते 8 (लक्ष्मीभवन चौक ते लक्ष्मीनगर चौक)
धरमपेठ वाय पॉईंट ते अलंकार चौक, काचीपुरा चौक व माताकचेरी चौकमार्गे पर्यायी मार्ग राहील.
– सायं. 7 ते रात्री 9 (लक्ष्मीनगर ते श्रद्धानंदपेठ)
माताकचेरी चौकातून निरी टी पॉईंट, आरपीटीएस व जेरील लॉनमार्गे वाहतूक वळविण्यात येईल.
-रात्री 9 ते 10 (श्रद्धानंदपेठ ते तिडके वाय पॉईंट)
माताकचेरी चौक, काचीपुरा चौक व अलंकार चौकमार्गे वाहतूक वळवली जाईल.
नागरिकांसाठी सूचना-
दिलेल्या वेळेत संबंधित मार्ग टाळावेत
वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे
पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे
वाहतूक पोलीस उपआयुक्तांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, सणाच्या काळात शिस्त राखून सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची विनंती केली आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





