Published On : Fri, Jun 16th, 2023
By Nagpur Today Nagpur News

‘नागपूर टुडे’ स्पेशल ; झोन 3 चे पोलीस उपायुक्त गोरख भामरेंबद्दल जाणून घेऊया !

नागपूर: नागपूर: नागपूरकरांमध्ये त्यांच्या स्थानिक पोलिस उपायुक्तांबद्दल (DCP) जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘तुमच्या डीसीपीला जाणून घ्या’ या मथळ्याखाली ‘नागपूर टुडे’ने झोन 3 चे डीसीपी गोरख भामरे यांची मुलाखत घेतली.

डीसीपी भामरे हे 2017 च्या बॅचचे IPS अधिकारी (महाराष्ट्र कॅडर) आहेत. त्यांनी आज नागपूर टुडेशी संवाद साधत त्यांच्या झोनशी संबंधित तपशील शेअर केले. ज्यात कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली आणि शांती नगर पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

डीसीपी गोरख भामरे यांनी नागरिकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या वैयक्तिक मोबाइल नंबर – 9284165296 – वर थेट कॉल करण्याचे आवाहन केले आहे. इतकेच नाही तर त्यांनी नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी त्याना आश्वासन दिले की त्यांची ओळख गुप्त राहील. संवादादरम्यान, डीसीपी गोरख भामरे यांनी झोन 3 मधील विविध संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच परिसरातील लोकांच्या सुरक्षिततेशी संबंधित समस्यांवर पोलीस कशा प्रकारे लक्ष देत आहेत याबाबतही त्यांनी भाष्य केले.

IPS अधिकारी होण्याच्या त्याच्या वैयक्तिक प्रवासाविषयी त्यांनी मुलाखतीदरम्यान माहिती दिली. इतकेच नाही तर UPSC उमेदवारांना आवश्यक असलेला मोलाचा सल्लाही भामरे यांनी दिला.

मुलाखतीदरम्यान DCP गोरख भामरे यांनी पोलिस कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षणाची आठवण शेअर केली. आम्ही बेपत्ता झालेल्या 4 महिन्याच्या मुलाला शोधून त्याला त्याच्या कुटुंबीयांकडे सुरक्षितपणे सोपविले. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण असल्याचे ते म्हणाले.

– रविकांत कांबले

Advertisement
Advertisement