Published On : Thu, Aug 29th, 2024
By Nagpur Today Nagpur News

‘नागपूर टुडे’ इमपॅक्ट ;नागपूरच्या मोर भवन बसस्थानकात खड्डे बुजवण्याचे काम सुरू

मनपा आयुक्त चौधरी यांनी दिले होते निर्देश
Advertisement

नागपूर : शहरातील मध्यवर्ती बसस्थानक म्हणून मोरभवन बसस्थानक ओळखले जाते. या बसस्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात.

पावसामुळे मोरभवन बसस्थानक स्थानकात चिखल व पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वीच नागपूर टुडेच्या टीमने याकडे लक्ष वेधले होते.

यांनतर नागरिकांना होणारा त्रास पाहता महापालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. वरील सूचनांनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व हॉटमिक्स प्लांट विभागाने माती व गाळ टाकून खड्डे बुजवून सपाटीकरणाचे काम सुरू केले आहे.

काही दिवसांपूर्वी संततधार पावसामुळे मोर भवन (विस्तारित) बस डेपोमध्ये पाणी साचल्याने चिखल झाला होता.त्यामुळे बस चालविणे आणि आगारातून प्रवाशांना प्रवास करणे कठीण झाले होते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.