Published On : Mon, Dec 12th, 2022
By Nagpur Today Nagpur News

समृद्धी महामार्गावरून प्रवासी सेवा:नागपूर ते शिर्डी नाॅन एसी बस गुरुवारपासून सुरू होणार, भाडे 1300 रुपये

Advertisement

समृद्धीचा पहिला टप्पा सुरू होताच नागपूर ते शिर्डी विनाथांबा नाॅन एसी बससेवा

मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यानंतर येत्या गुरूवार १५ डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी अशी नाॅन एसी बससेवा सुरू करण्यात येणार आहे.

बसचे भाडे 1300 रुपये

विना थांबा असलेली ही शयनयान बस नागपूर येथील गणेशपेठ बसस्थानकावरून रात्री ९ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता शिर्डीला पोहोचेल. बसचे भाडे १३०० रूपये राहिल, असे विभाग नियंत्रकांनी कळवले आहे. या बसमध्येही ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर ६५ वर्षावरील नागरिकांना ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.

Advertisement

महामार्गाचे वैशिष्ट्य निर्गमन पथकर

समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे निर्गमन पथकर (एक्झिट टोल). निर्गमन पथकर म्हणजे बाहेर पडताना देता येणारा कर. याचाच अर्थ तुम्ही जितके अंतर या मार्गावरुन कापले, तितकेच पैसे तुम्हाला द्यावे लागतील. समृद्धी महामार्गाने नागपूर ते मलकापूर असा प्रवास केला, तर मलकापूरपर्यंत जितके अंतर होईल, तितकाच पथकर तुम्हाला द्यावा लागेल, तुमच्याकडून मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा पथकर वसूल केला जाणार नाही.

नागपूर ते शिर्डी 900 रुपये टोल

पहिल्या टप्प्यात (नागपूर ते शिर्डी) मुख्य मार्गिकेवर फक्त वायफळ येथे पथकर नाका असणार आहे. इतर इंटरचेंजेस धरून एकूण २० नाके आहेत. निर्गमन पथकर पद्धतीनुसार समृद्धी महामार्गावर जेवढ्या अंतराचा प्रवास होईल, तेवढाच पथकर आकारण्यात येणार असल्याने सद्य:स्थितीत नागपूर ते शिर्डी हलक्या वाहनांकरिता सुमारे ९०० रुपये एवढा पथकर असेल. पथकर हा फास्ट टॅग, कार्ड, वॅालेट, रोख अथवा ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.